NAVODAYA ALUMNI'S WELFARE ASSOCIATION

Helping The Future...

नमस्कार मित्रांनो,


बरेच दिवस झालेत तुमच्याशी बोलून. मागील वर्षी दिवाळीला आपण सर्व भेटलो आणि तेव्हा पासून काही भेट पण नाही. तेव्हा म्हटल की चला आज जरा संवाद साधावा.

मी कोण? असा सर्वांनाच प्रश्न पडतो आणि बर्‍याच जणांना उत्तर पण माहीत आहे. कुणाला माझ नाव माहीत आहे तर कुणाला माझा चेहरा आणि कुणाला माहीत आहे कुणीतरी आपला सीनियर / जुनिअर. परंतु मित्रांनो आज मी तुमच्या समोर एका संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अलेलो आहे. आता ही कुठली संघटना?? ही संघटना माझी नाही किव्हा तुमची नाही तर आपण सर्वांची आहे आणि तीच नाव आहे "नवोदाया एलम्नाइ'स वेलफेर असोसियेशन" किव्हा तुम्ही म्हणू शकता " नवोदाय माजी विद्यार्थी कल्यणकारी संघटना". आता ही संघटना कुणी बनवली, कधी बनवली आणि कशासाठी बनवली. आजही बरेच मित्रांना याबद्दल माहीत नाही आणि तीच सांगायला आज मी आलोय.


नवोदाया एलम्नाइ'स वेलफेर असोसियेशनची स्थापना २००८ मधे झाली. त्या आधी "स्टूडेंट वेलफेर असोसियेशन ऑफ नवोदाया" या संघटनेची स्थापना आपल्या काही सीनियर भाउनि केलेली. पुढे जाउन तीच नवोदाया एलम्नाइ'स वेलफेर असोसियेशन मधे रुपांतर झाली. संघटनेची नोंदणी २०११ मधे सहायक धर्मादाय कार्यालय वर्धा येथे करण्यात आली. (रेजिस्ट्रेशन क्र.: एमएच-३०/११/फ-६७४०) . आपण सगळे नवोदय विद्यालयाचे जिवलग मित्र आहोत आणि त्या नात्याने आपणा सगळ्यांमधे एक सामाजिक बांधीलकिचे नाते आहे. याच उद्देशाने समाजासाठी काहीतरी कराव म्हणून आपण सगळ्यानी मिळून ही संघटना तयार केली. या संघटनेची स्वताची एक विचारसरणी पण आहे. त्यातील काही धेय खालील प्रमाणे आहेत.


१. नवोदाया एलम्नाइ'स वेलफेर असोसियेशन हा एक परिवार आहे आणि या परिवारातील लोकांचे सामर्थ जाणून घेण्यासाठी हवी ती मदत करणे.
२. नवोदाय विद्यालयातील विद्यार्थांमधे एकता, मित्रता व सहभागिता वाढवणे.
३. अनुभव आणि माजी विद्यार्थी कृत्ये माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन प्रदान करणे.
४. नवोदायतील विद्यार्थी यांचा विकास व सुधारणे साठी नवोदय माजी विद्यार्थी मधे एकजुटी निर्माण करणे.
५. शिष्यवृत्ती आणि पुरस्कार याबद्दल माहिती आणि इतर उपयोगिता बद्दल प्रोत्साहन वाढवणे.
६. नवोदाय विद्यालयातील विद्यार्थाना सामाजिक, आर्थिक व परिवारीक मदत करणे.


2008 पासुन सुरु झालेल हे कार्य आज जोमाने सुरु आहे. सुरुवातीला ही संघटना सुरु करताना फार त्रास झाला. आपल्या वर्गातील काही मित्र काही जूनियर काही सीनियर घेऊन प्रवास सुरु झाला. या कार्यात आपल्याला सदैव आपल्या शिक्षकांनी मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले. आपण गेल्या ८ वर्षात पूर्ण केलेल्या वा सुरू असलेल्या कामांचा आढावा खालील प्रमाणे आहे.


१. आतापर्यंत आपण २८ गरीब व होत्करु विद्यार्थाना जवळपास ९ लाखांची आर्थिक मदत केली. मदत करताना आपण एकाच इच्छा प्रकट केली की जेव्हा हे विद्यार्थी स्वताहा नोकरी वा व्यवसाय सुरू करतील तेव्हा ते ही रक्कम परत करतील जेणेकरून बाकीच्या मुलांना नंतर मदत करत येईल.
२. इयत्ता दहावी मधील विद्यार्थांसाठी आपण उन्हाळी सुट्टी मधे सम्मर क्रॅश कौर्से राबवतो. गेल्या मागील ७ वर्षापासून आपल हे काम सुरू आहे. यातून येणारा पैसा आपण गरीब व होतकरू विद्यार्थांच्या कामात आणतो. क्लासेस च्या अखेरेस आपण एक सहल सुद्धा आयोजित करतो.
३. क्लासेस मधे आधून मधून बरेच माजी विद्यार्थी भेट देत असतात, ज्यातुन विद्यार्थाना बरेच मार्गदर्शन होत असते.
४. आजी व माजी विद्यार्थ्यांची भेट व ओळख व्हावी म्हणून आपण प्रतेक वर्षी विद्यार्थी मेळावा पुणे व वर्धा मधे आयोजित करतो.
५. आपण आपल्या एका विद्यार्थी / आपला मित्र, कै. नितीन नाईक (बॅच १९९२) याच्या लहान मुलीचे शिक्षणाकरिता मदत करतो. आत्तापर्यंत आपण ६०००० हजारची मदत केलेली आहे. यासाठी आपण "नितीन नाईक फॅमिली हेल्प फंड" असा उपक्रम राबविला होता. नितीन नाईक एक होत्करु सदस्य होता. २०१४ मधे त्याचा एका अपघातात मृतू झाला.
६. नावा च्या माध्यमातून व वेट्स अप च्या सहकार्याने आपण एक ग्रूप पण बनवलेला आहे ज्यात बर्‍यापैकी प्रत्येक बॅच चे विद्यार्थी सहभागी आहेत. ग्रूप मधे जवळपास २४० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी आहेत.
७.नावा च्या माध्यमातून व वेट्स अप च्या सहकार्याने आपण बँकिंग चा ग्रूप पण बनवलेला आहे, ज्यामुळे आपल्याला पाहिजे ती बॅंकेची मदत मिळवू शकतो.


असा हा आपला आत्तापर्यंतचा प्रवास आहे व तो सतत असाच सुरू राहावा अशी आमची इच्छा आहे. बरेचदा समाजासाठी काही करत असताना आपल्याना बर्‍याच कष्टातून जाव लागत. म्हणून आम्हा सर्वांची आपण सर्वांना विनंती आहे की, आपण आम्हास मार्गदर्शन व सहकार्या करावे.

वरील संदेश वाचताना तुम्ही आपला अमुल्य वेळ आम्हास दिला याबद्दल धन्यवाद. कृपया या संदेश नवोदायतील सर्व मित्रांना पाठवावा हीच विनंती !!!!


आपला विनम्र
कार्यकर्ता
नवोदाया एलम्नाइ'स वेलफेर असोसियेशन
केदार कॉंप्लेक्स, बॅंक ऑफ महाराष्ट जवळ,
आर्वी रोड, वर्धा (४४२००१)